25.9 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeराष्ट्रीयछठपुजेला गेलेले ६ जण बुडाले

छठपुजेला गेलेले ६ जण बुडाले

रोहतास : बिहारच्या रोहतास जिल्ह्यात छठ पूजेच्या निमित्ताने तिलोथू सोन नदी आणि भानस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कालव्यात आंघोळीसाठी गेलेल्या ६ जण डुबल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामधील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत तिलौथूमध्ये अंघोळीसाठी गेलेले ४ जण सोन नदीत बुडाले.

पिंटू यादव (३५), धर्मेंद्र यादव (४०), बबलू कुमार (१२), आणि विकास यादव (२५, सर्व रहिवासी पथरा) अशी त्यांची नावे आहेत. घटनेनंतर स्थानिकांनी आणि स्वयंसेवकांनी विकास यादवला वाचवले आणि पीएचसीमध्ये पाठवले. यानंतर पुढील उपचारासाठी सासाराम येथील सदर रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर पिंटू यादव यालाही बाहेर काढण्यात आले. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धर्मेंद्र यादव यांचाही मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तर बबलू कुमारचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे वीरेंद्र यादव यांनी आपली दोन मुले आणि एक नातूला गमावल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR