20.6 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात थंडीची चाहूल

राज्यात थंडीची चाहूल

पुणे : दिवाळीनंतर थंडीने आता चाहूल द्यायला सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसांमध्ये तापमान काही अंशी घसरले आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी थंडी पडत आहे. शुक्रवारी सांगली कमी तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी तिथे १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अहिल्यानगर येथे त्या खालोखाल १४.७ अंश सेल्सिअस तापमान होते.गेल्या आठवडाभरापासून राज्यातील तापमानामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी राज्यात थंडी पडली नाही; पण पावसाचे वातावरण होते.

दिवाळी संपली आणि पहाटे गारठा आणि दुपारी ऊन अनुभवायला मिळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील नाशिकमध्ये नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील पाच दिवस राज्यामध्ये कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

किमान तापमानाची नोंद
सांगली १४.४
अहिल्यानगर १४.७
पुणे १५.२
जळगाव १५.८
महाबळेश्वर १५.६
मालेगाव १७.८
सातारा १६.६
परभणी १८.३
नागपूर १८.६

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR