20.6 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeराष्ट्रीयदुखावला असाल तर माफ करा

दुखावला असाल तर माफ करा

सीजेआय चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला सर्वांना वाकून नमस्कार

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे आजपासून निवृत्त झाले असून आज त्यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरचा शेवटचा दिवस होता. चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबरला संपणार आहे, परंतू ९ व १० नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाला सुटी असल्याने आजचा त्यांचा अखेरचा दिवस ठरला आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जावर त्यांनी महत्वाचा निर्णय दिला आणि सर्वांचा निरोप घेतला.

यावेळी चंद्रचूड भावूक झाले होते. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते सर्वांना मस्तक झुकवून नमस्कार करत आहेत. यावेळी अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांच्यासह अनेक वकिलांनी ऑनलाईन स्ट्रिमिंगद्वारे चंद्रचूड यांना निरोप दिला. निरोपावेळी चंद्रचूड यांनी म्हटले की, जर कोणाला दुखावले असेल तर मी माफी मागतो. चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. यावेळी त्यांनी काही ऐतिहासिक निर्णय दिले. राम मंदिर, इलेक्टोरल बाँड, समलैंगिक विवाह, आर्टिकल ३७० असे अनेक निर्णय त्यांनी दिले. महाराष्ट्रातील राजकीय वाद चंद्रचूड यांच्याच न्यायालयात आला होता. परंतू, त्यावर चंद्रचूड यांना निर्णय करता आला नाही.

इतिहास माझ्या कारकीर्दीचे मूल्यमापन कसे करेल? मी काही वेगळे करू शकलो असतो का? न्यायाधीश आणि कायदे क्षेत्रात येणा-या भावी पिढ्यांसाठी मी कोणता वारसा ठेवू जाईन? असे प्रश्न पडत असल्याचे सरन्यायाधीशांनी महिनाभरापूर्वी म्हटले होते. यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि कदाचित यातील काही प्रश्नांची उत्तरे मला कधीच मिळणार नाही, असे ते म्हणाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR