20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय

कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय

मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिकांची स्पष्टोक्ती

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. एका सभेत बोलताना त्यांनी बटेंगे तो कटेंगे, असे म्हटले. त्यावरुन आता राजकारण तापले आहे. एकीकडे महाविकास आघाडी टीका करत आहेत, तर दुसरीकडे महायुतीतील अजित पवारांनीदेखील यावरुन भाजपला घरचा आहेर दिला.

आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका खासगी वाहिनीशी बोलताना नवाब मलिकांना योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणे विचारण्यात आले. नवाब मलिक म्हणाले की, आमच्या पक्षाची विचारधारा स्पष्ट आहे, आम्ही धर्मावर आधारित राजकारण करत नाही. असे राजकारण आम्हाला मान्य नाही. आमचा धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे. आमचे स्पष्ट मत आहे की, जर कोणी असे विधान केले, तर ते चुकीचे आहे.

धर्मनिरपेक्षता हा भारताच्या एकतेचा मूळ मंत्र आहे. निवडणुकीत अशी विधाने करून चर्चा होते, पण एकता हाच सर्वात मोठा मंत्र आहे असे मला वाटते. कोणी नकारात्मक राजकारण केले तर लोक ते स्वीकारत नाहीत, अशी विधाने लोकांना मान्य नसल्याचे यूपीच्या निकालावरून दिसून येते.

आम्ही विभाजनाचे राजकारण करत नाही
मलिक पुढे म्हणतात, महाराष्ट्रात जो कोणी असे राजकारण करतो, त्याच्या विरोधात अजित पवार उभे राहतात. असे काही पक्ष आहेत ज्यांना मुस्लिमांची मते हवी आहेत, परंतु त्यांच्या मुद्यांवर बोलणे टाळतात. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. फुटीचे राजकारण करणा-यांना आम्हाला संदेश द्यायचा आहे की, त्यांनी असे राजकारण करू नये, ते देशाच्या आणि जनतेच्या हिताचे नाही. आम्ही असे राजकारण कधीच करत नाही, अशी स्पष्टोक्त मलिकांनी दिली.

नरेंद्र मोदींचा फोटो का वापरत नाही?
नवाब मलिकांनी आपल्या निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींचा फोटो लावला नव्हता. याबाबत त्यांना विचारत्यावर मलिक म्हणाले की, मोदीजींचा पक्ष माझ्याविरोधात निवडणूक लढवत आहे. कोणाचा फोटो वापरायचा, कोणाच्या नावाने मते मागायची, हा आमचा निर्णय आहे. आम्ही आमच्या विचारधारेवर मते मागत आहोत, आम्ही आमच्या नेत्यांचे फोटो वापरू. आम्ही आमच्या मतांवर ठाम आहोत. विचारांशी आमची तडजोड नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR