पूर्णा : येथील नगरपालिकेला पाणीपुरवठा करणारा कोल्हापुरी बंधारा फुटला होता. त्यामुळे पुर्णेकरांना पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कार्यकारी अभियंता मृदा संधारण विभागाला तात्काळ आदेशित करून बंधारा दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोल्हापुरी बंधारा दुरुस्तीची दि.२९ नोव्हेंबर जिल्हाधिकारी गावडे यांनी स्वत: पाहणी केली.
बंधा-याचे काम झाल्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी बंधा-या अडले आहे. त्यामुळे पुर्णेकरांचा पाणी प्रश्न सुटला असून नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथीकर, नगरपालिकेचे मुख्यअधिकारी युवराज पौळ, राजकिरण गुट्टे, मृदा संधारण अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.