21.4 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानापूर्वीच अजित पवारांचा दावा; १ लाख मताधिक्क्याने विजयी होणार

मतदानापूर्वीच अजित पवारांचा दावा; १ लाख मताधिक्क्याने विजयी होणार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीतील काका-पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच अजित पवार यांनी मी बारामतीमध्ये १ लाखाहून अधिक मतांनी जिंकणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर लोकसभेत प्रथमच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे गेले. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीत सामना रंगला. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच आता अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीत १७५ हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी लाखांहून अधिक मतांनी जिंकणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

युगेंद्र, रोहितचा पलटवार
विधानसभा निवडणुकीत १७५ हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी लाखांहून अधिक मतांनी जिंकणार, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवारांच्या या विश्वासावर त्यांचे प्रतिस्पर्धी युगेंद्र पवार आणि पुतण्या रोहित पवार यांनी पलटवार केला. आम्ही सगळेच राजकारणात राहणार आहोत, पण २३ तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, आमच्या १६७ ते १८० च्या आसपास जागा येतील, परंतु नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी सभा घेतल्या तर आणखी २० आमदार वाढतील, असा टोला रोहित पवारांनी भाजपच्या बड्या नेत्यांना लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR