19.7 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्र...म्हणून विरोधक टीका करीत नाहीत

…म्हणून विरोधक टीका करीत नाहीत

नितीन गडकरींनी स्वत:च दिले उत्तर

नागपूर : निवडणूक म्हटले की आरोप प्रत्यारोप हे आलेच. मात्र भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मात्र विरोधक फारशी टीका करत नाहीत, असे का? याचे उत्तर त्यांनी दिले असून एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी यामागचे कारण सांगितले आहे.

नितीन गडकरी यांनी विशेष मुलाखतीत या मागचे विरोधक गडकरींवर फारशी टीका करत नाहीत? या मागचे मॅजिक काय? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले आहे. गडकरी म्हणाले, मी काही कुशल राजकारणी नाही. मी सामान्य व्यक्ती आहे. माझे सर्वांशी संबंध चांगले आहेत. मी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे, दोन रेषा आहेत एक आपली आणि एक दुस-यांची. आपली मोठी करायची आणि दुस-यांची पुसण्याचा प्रयत्न केला की आपली मोठी होती. पण मी मी पहिले ठरवले आपली रेषा मोठी करायची. आपले कह्याम करायचे अये स्पष्ट उत्तर गडकरींनी दिले आहे.

दुसरे म्हणजे, आपला विचार काय आपली भूमिका काय हे लोकांना सांगायचे. दुस-यांच्या भूमिकेवर जास्ती टीका करण्याची काही गरज नाही. महत्त्वाचा मुद्दा असेल तर सांगता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे, निवडून आल्यानंतर तुम्ही पक्षाचे नाही आहात तर त्या परिसराचे प्रतिनिधी आहेत. योग्य काम सगळ्यांचे करायचे. आलेल्या प्रत्येक माणसाशी चांगले वागायचे. हे सर्व आम्हाला अटल बिहारी वाजपेयींकडून शिकायला मिळाले. मी अटल बिहारी वायजेयी व जॉर्ज फर्नांडिस या दोन नेत्यांना आयुष्यात खूप मानतो असे गडकरींनी म्हटले आहे.

मी खरोखरच नशीबवान आहे की, मला विरोध करणारा व्यक्ती जो काँग्रेसकडून उभा आहे. तो मला फोन करुन मला तुम्हाला भेटायचे आहे. मला तुमचा आशीर्वाद हवा, मी त्याला म्हटले की मी तुम्हाला कशी मदत करु त्यावर. ते म्हणाले की, मला तुमची मदत नकोय पण तुमचा आशीर्वाद घेण्याचा अधिकार मला आहे. ते भेटले गेले मी काही त्यांना मदत नाही केली. कारण मी माझ्या पक्षाशी बांधिलकी आहे. शेवटी आम्ही एकमेकांचे विरोधक आहेत, दुष्मन नाहीत. एकमेकांमध्ये वैचारिक मतभिन्नता आहे व शत्रुत्व नाही. हे लक्षात ठेवले तर राजकारण पुष्कळ चांगले होईल असे गडकरींनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR