23.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रमाता-बहिणींच्या केसाला धक्का लावला तर हात उखडून टाकेल

माता-बहिणींच्या केसाला धक्का लावला तर हात उखडून टाकेल

मनमाड : प्रतिनिधी
कोल्हापूरचा मुन्ना धमकी देतोय. मी त्याला सांगतो तू माझ्या माता-बहिणींच्या केसाला धक्का लावला तर हात उखडून टाकेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर हल्लाबोल केला.

लाडकी बहीण योजनेवरून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश धात्रक यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची आज मनमाड शहरात सभा होत आहे. यावेळी ते बोलत होते.
तुमच्यासाठी लढणारा आमदार पाहिजे की रडवणारा आमदार पाहिजे? आमदार पाहिजे की डाकू पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली.

गद्दारांनो तुमचा पापाचा घडा फोडून तुरुंगात कांदे सोलायला पाठवेल असेही ठाकरे म्हणाले. शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार- षटकार मारायचे आहेत. मातृशक्तीला नमस्कार करतो. संभाजीनगरमध्ये गेलो तिथला मिंधेंचा उमेदवार म्हणतो, मत दिले नाही तर ३ हजार परत घेऊ, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. तुझी खेटराने पूजा करायची का? पोलिस आणि गुंड घेऊन फिरतो. मीच तुम्हाला हा उमेदवार दिला. माझेच दुर्दैव आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कांदे यांच्यावर टीका केली.

निष्ठावंतांच्या हातात भविष्य द्या
आमचं सरकार महिलांना सुरक्षा देणार, ३ हजार रुपये देणार, पुन्हा शेतकरी कर्जमुक्त करायचे आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे मशाल पेटवायची आहे. इथे आलेल्या माता-भगिनींचे आशीर्वाद पाहिजेत. आई-वडिलांचे आशीर्वाद पाहिजेत. तुम्ही जर मर्दाची औलाद असाल तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुझ्या वडिलांचा फोटो लाव. त्या दाढीवाल्या मिंधेलाही सांग तुझ्या वडिलांचा फोटो लाव असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. निष्ठावंतांच्या हातात तुमचे भविष्य द्यायचे की गद्दारांच्या हे ठरवा, असेही ठाकरे म्हणाले.

ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या मुळावर आहेत त्याच गोष्टी मोदी-शहा करत आहेत. शेतक-यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे, म्हणून अनेक मुले शिक्षण घेत नाहीत. आपले सरकार आल्या मुलांना मोफत शिक्षण देणार आहे. सोयाबीन आणि कांद्याचे भाव पडत आहेत असे ठाकरे म्हणाले. मोदी आणि अमित शहा हे गद्दाराच्या प्रचारासाठी येत आहेत. आपले नाव, निशाणी, सुख-समाधान चोरले आणि अगदी बेशरमपणाने फिरतोय असेही ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR