21.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरभाजपा महायुतीच्या लबाडांना आता घरी बसवा 

भाजपा महायुतीच्या लबाडांना आता घरी बसवा 

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील भाजपा महायुतीच्या सरकारने खोटे बोलून जनतेची फसवणूक केली आहे. जाती, धर्मात भांडणे लावून स्वत:चा स्वार्थ साधण्या पलीकडे सत्ताधा-यांनी काहीच केले नाही. भूलथापा, दिशाभूल आणि खोटे बोलणे हेच या सत्ताधा-यांनी केले आहे. काँग्रेस महाविकास आघाडीने जनसामान्यांच्या हितासाठी विकासाची पंचसूत्री जाहीर केली आहे त्यामुळे तमाम मतदार भगिनींनी काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित देशमुख यांना प्रचंड मतांनी विजय करून भाजप महायुतीच्या लबाडांना आता घरी बसवा, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लातूर तालुक्यातील कव्हा येथे श्रीमती वैशालीताई देशमुख यांची पदयात्रा झाली त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी सुनिता अरळीकर, विमलताई बर्वे, भाग्यलक्ष्मीताई रुकमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, काँग्रेस महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात ‘मविआ’ने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करतानाच शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव दिला.  महिलांना, मुलींना सुरक्षा दिली, आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या, सिंचन, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, शांतता, पाणी, रस्ते, वीज या सर्व सुखसोयी निर्माण केल्या. आपले उमेदवार अमित देशमुख यांनी लातूरसाठी २४०० कोटी रुपयांचा विकास निधी आणला. या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. ज्या कामांची मंजुरी घेतलेली आहे तीही विकास कामे सुरू होत आहेत त्यामुळे मतदारांनी भूलथापांना बळी न पडता माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नावापुढील हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रचार रॅलीत अनुराधा सारगे, मीरा सारगे, उषा सारगे, अनुसया कलबोने, बालिका सारगे, मदिना शेख, वैशाली बोटले, अश्विनी सारगे, सुवर्णा सारगे, अनुसया पिटले, सुवर्णा इरले, मिनाबाई कांबळे, चंद्रकला कांबळे, संगीता भालेराव, शोभाबाई भालेराव, केवळबाई कांबळे, सुनीता गायकवाड, शालू मगर, संगीता चांदणे, विमलबाई चांदणे,  खातून शेख, दैवशाला गदले, दैवशाला सातपुते, विमलबाई देशमुख,  विजयाबाई चांदणे, शांताबाई देशमुख, शांताबाई देवकते, विजयमला इरले, पार्वती कांबळे, लायक सय्यद, कांचना वाघमारे, केवळबाई सरवदे, वच्छला कवरे, महानंदा कांबळे यासह आदी महिला व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित
होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR