17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरखंडाळी परिसरात पावसामुळे कापसाचे नुकसान

खंडाळी परिसरात पावसामुळे कापसाचे नुकसान

खंडाळी : वार्ताहर
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परीसरात दि.२७, २८ नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. खंडाळीसह धसवाडी, नागझरी, उजना, वंजारवाडी, बेंबडेवाडी आदी गावांना अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.एका दिवसांत तब्बल ५८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे वेचणीस आलेला कापूस मातीमोल झाला असून शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे सोसाट्याच्या वा-यासह विजांचा कडकडाटासह अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला फळबाग, रब्बीसह शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने त्वरित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. खंडाळी परीसरात कापसाची लागवड दरवर्षी अधिक असते. यावर्षी गत वर्षीपेक्षा अधिक प्रमाणात कापसाची लागवड झाली आहे. पावसाअभावी जूलैच्या अखेरीस कापसाची लागवड झाली. लागवड झाल्यानंतर पावसाच्या माठ्या खंडामुळे फळधारणा कमी झाली. कशीबशी दहा-पाच बोंडे लागली होती. सध्या कापसाची वेचणी सुरू असतानाच अवकाळी झालेल्या पावसाच्या तडाख्याने शेतक-याचे स्वप्न धुळीस मिळविले आहे.

खंडाळी मंडळात दोन दिवसांत १०० मिमी च्या जवळपास पावसाची नोंद होऊन अतीवृष्टी झाली, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेत कापसा सह, तूर, भाजीपाला भूईसपाट झाला आहे. अहमदपूर अवर्षणग्रस्त तालुका म्हणून शासन दरबारी नोंद आहे. निसर्गाच्या लहरीपणाने व सततच्य दुष्काळाने शेतकरी हतबल झाला आहे. ंिलबोटी धरणाचे पाणी शेजारी असलेल्या ऊजना, बेंबडेवाडी आदी गांवाना लाभ मिळतो परंतु खंडाळीस लाभ मिळत नाही. खंडाळीला ंिलबोटी धरणाचे पाणी आल्यास शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे. खंडाळी परीसरातील जमीन सुपीक- कसदार आहे. खंडाळीला ंिलंबोटी धरणाचे पाणी आणण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेतीचे उत्पन्न बिनभरवशाचे झाले आहे. त्यामुळे कधी दुष्काळ तर कधी अवकाळीच्या तडाख्यात शेतक-यांंच्या कर्जाचा आलेख वाढतच चालला आहे.त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांतून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR