उदगीर : शहरात आज शुक्रवारी पहाटे ५:१७ मिनिटाला पारकटी गल्ली येथे बाळू अण्णा बागबंदे यांच्या घरी बिबटया उड्या मारत फिरल्याने संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदरील ठिकाणी नगर परिषद उदगीर, व जिल्हा प्रशासन लातूर व वन विभागाची टीम बिबट्याला पकडण्यासाठी व उपाययोजना राबविण्यासाठी दाखल झाली असून येथून बिबट्या किल्ला परिसरात गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून याला वन विभागाचे रामेश्वर केसाळे यांनी एकमतशी बोलताना दुजोरा देत या परिसरातील व शहरातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, अफवा पसरवू नये तसेच वन विभागाच्या टीमला सहकार्य करावे, व सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.