26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयव्यावसायिक सिलिंडर १६ रुपयांनी महागला

व्यावसायिक सिलिंडर १६ रुपयांनी महागला

घरगुती सिलिंडरच्या किमती जैसे थे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात महागाईचा जोरदार झटका बसला आहे. तेल वितरक कंपन्यांनी डिसेंबरच्या पहिल्या तारखेलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. देशभरात आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १६.५ रुपयांची वाढ केली आहे.

त्याचवेळी १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मागच्या महिन्यातही वाढ केली होती. आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दिल्लीत १८१८.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी त्याची किंमत १८०२ होती तर मुंबईमध्येही १७५४.५० रुपयांना मिळणारा गॅस आता १७७१ रुपयांना मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR