मॉस्को : सीरियामध्ये पुन्हा एकदा सरकार आणि बंडखोर गटांमधला संघर्ष तीव्र झाला आहे. ब्रिटनच्या सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ुमन राईट्स (एसओएचआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सिरीयात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत ३७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
एसओएचआरने दिलेल्या माहितीनुसार सीरियाच्या दक्षिणेत वाढत चाललेल्या बंडखोरीला मोडीत काढण्यासाठी रशियाने रविवारी पहाटे अनेक हवाई हल्ले केले आहेत. एसओएचआरने या प्रकरणातील माहिती देताना सांगितले की, रशियाने इदलिब आणि हमाच्या ग्रामीण भागाला लक्ष्य करून हे हल्ले केले आहेत. सीरियातल्या बंडखोर गटांनी अलीकडेच या भागावर नियंत्रण मिळवले होते.
याआधी रशियाने २०१६ मध्ये अलेप्पोवर हल्ला केला होता. त्यानंतर शनिवारी रशियाने सीरियावर हवाई हल्ला केला. सीरियन बंडखोरांनी सीरियातले दुस-या क्रमांकाचे शहर ताब्यात घेतल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. एसओएचआरने सांगितले की, बंडखोर सैनिकांनी शनिवारी सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर असणा-या अलेप्पोच्या दक्षिणेकडील हमाजवळील अनेक ग्रामीण भागांमध्ये प्रवेश केला. हमा हे सीरियातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
एसओएचआरने सोशल मीडियावर लिहिले आहे, सीरियन लष्कराने आता या परिसरातील अनेक शहरे आणि गावांभोवती संरक्षणाची रेषा आखली आहे.
शनिवारी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांनी ‘सर्व बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांविरोधात लढण्याची आणि सीरियाच्या स्थिरता आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याची शपथ घेतली.