23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeराष्ट्रीयराफेल पुन्हा भारतात येणार; रु. १ लाख कोटींचा करार!

राफेल पुन्हा भारतात येणार; रु. १ लाख कोटींचा करार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत फ्रान्सकडून २६ राफेल मरीन फायटर जेट्स आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पियन वर्गाच्या पाणबुड्या खरेदी करार करण्याच्या तयारीत आहे.

भारताने इंडियन एअर फोर्ससाठी फ्रान्सकडून ३६ राफेल फायटर विमाने आधीच विकत घेतली आहेत. आता २६ राफेल मरीन फायटर जेट्स भारतीय नौदलासाठी विकत घेण्यात येणार आहेत. राफेल आणि स्कॉर्पियन पाणबुड्यांची डील अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या महिन्यात त्यावर स्वाक्षरी होऊ शकते, असं नौदल प्रमुख एडमिरल दीनेश के. त्रिपाठी म्हणाले.

नुकताच बॅलेस्टिक मिसाइलद्वारे अणवस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या ‘आयएनएस’ अरिघात पाणबुडीचा भारतीय नौदलात समावेश झाला. त्यामुळे भारताची पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता अधिक बळकट झाली, असे अ‍ॅडमिरल दीनेश के. त्रिपाठी म्हणाले.

भारताने ३१ सशस्त्र एमक्यू-९बी प्रीडेटर ड्रोन्ससाठी अमेरिकेसोबत ३२,३५० कोटींचा करार केला आहे. आता फ्रान्सकडून २६ राफेल मरीन फायटर जेट्स आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पियन वर्गाच्या पाणबुड्यांसाठी १ लाख कोटींच्या आसपास करार होऊ शकतो. अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या के-४ मिसाइलचा पल्ला ३५०० किमी असल्याची दीनेश त्रिपाठी यांनी पुष्टी केली. के-४ मिसाइलची चाचणी यशस्वी ठरली. या मिसाइलची रेंज ७५० किलोमीटर पर्यंत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR