34.6 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरअंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला

अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला

बीड: अंबाजोगाई शहरात गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धाड मारली. यात १० लाख ६७ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. गणेश बिडवे, किरण रविंद्र शेटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यांनी अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजनच्या गोदामात गुटख्याचा साठा करुन ठेवला होता. याची माहिती बाळराजे दराडे यांना मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाने या गोदामावर धाड टाकली. यावेळी १० लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक बाळराजे दराडे, पोलिस उपनिरीक्षक घाडगे, जायभाये, मोराळे, मुंडे, नागरगोजे, मस्के, सानप आदींनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR