28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींना महागाईचा झटका

लाडक्या बहिणींना महागाईचा झटका

लसूण ५०० रु. किलो, तेलाचे दरही गगनाला

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
सप्टेंबरनंतर राज्यातच नाही तर देशात महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. भाजीपाल्यासह खाद्यतेल, दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कांदा, लसणाने गृहिणींच्या नाकी नऊ आणले आहे. खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने घरचे बजेट सांभाळताना लाडक्या बहि­णींना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला पण लसणाने ५०० रुपये किलोचा उच्चांकी ठप्पा गाठला आहे. या सर्व महागाईत संसाराचा गाडा कसा हाकायचा असा सवाल लाडक्या बहिणी सरकारला विचारत आहेत.

दरम्यान, सध्या खाद्यतेल, जिरे, साबण, खोबरे, सुकामेव्याचे दर वाढले असून गृहिणीचे किचन बजेट बिघडले आहे. हिवाळ्यामध्ये पालेभाज्या थोड्या स्वस्त झाल्या असून टोमॅटोचे दर अजूनही चढेच आहेत. शेवग्याचा दर पाचशे ते साडेपाचशे रुपये किलो झाला आहे. भाजी मार्केटमधून शेवगाच गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाजारात आवक कमी असल्याने शेवग्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शेवगा खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

लसणाचा भाव वधारला
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले. एपीएमसी बाजारपेठेत सध्या लसणाचे दर ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो २० रुपयांची वाढ झालेली आहे. व्यापा-यांच्या म्हणण्यानुसार, सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत.

खाद्यतेलाने आणले जेरीस
तेलाच्या दरवाढीमुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गणपती उत्सवापासून आतापर्यंत तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत. सध्या मार्केटमध्ये सूर्यफूल तेलाचा १५ किलोचा भाव २२८० रुपये, पाम तेलाचा २१८० रुपये, तर सोयाबीन तेलाचा भाव २०५० रुपये आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR