22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeसोलापूरसोलापूरच्या प्रमिला ठमके यांचे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत यश

सोलापूरच्या प्रमिला ठमके यांचे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत यश

सोलापूर : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन असोसिएशन स्पोर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजिलेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन सोलापूरच्या स्पर्धेत प्रमिला ठमके यांनी ६५ ते ७५ या वयोगटातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला.

या स्पर्धेमध्ये ठमके या योगसाधना मंडळाच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धे त राज्यभरातून ४०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. ठमके यांनी घवघवीत यश संपादन केल्याने त्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांना आरती गोरटे, स्नेहल पेंडसे यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच या स्पर्धेमध्ये प्रमिला ठमके यांच्याशिवाय सोलापुरातून जयश्री उमर्जीकर , प्रभा कोडले, दिव्या राका, मोनिका गड्डम, शांता संगा व अशोक बिराजदार यांनी सहभाग नोंदवून विविध वयोगटातून घवघवीत यश संपादन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR