16 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमुंबई बॉम्बस्फोट : मास्टरमाइंड लख्वी पाकिस्तानमध्ये भूमिगत

मुंबई बॉम्बस्फोट : मास्टरमाइंड लख्वी पाकिस्तानमध्ये भूमिगत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लख्वी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केले आहे. गेल्या महिन्यात झकीउर रहमान लख्वीचा पाकिस्तानमध्ये फिरत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता झकीउर रहमान लखवीला भूमिगत करण्यात आलं आहे. लखवी हा अबू वासीच्या नावाने पाकिस्तानात फिरत असल्याचे समोर आले होते.

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सने मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकी-उर-रहमान लखवी याला भूमिगत होण्यास भाग पाडले आहे. त्याचा व्यायाम करताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक दाढी असलेला माणूस फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी असल्याचा दिसला. ही व्यक्ती जागतिक दहशतवादी असल्याचा अंदाज लावला जात होता. त्यानंतर तो झकीउर रहमान लखवी असल्याचे म्हटलं जात आहे.

२०२१ मध्ये पाकिस्तानी कोर्टाने दहशतवादी कारवायांसाठी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी लखवीला भूमिगत करण्याचा निर्णय घेतला. झकीउर-रेहमान लखवी हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि हँडलर आहे. भारत पाकिस्तानमध्ये का खेळत नाही, याचे उत्तर हे चित्र आहे. ज्या लाहोरमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार आहेत, तिथे हा दहशतवादी व्हीव्हीआयपीप्रमाणे आपली तब्येत सांभाळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR