वॉशिंग्टन/मुंबई
महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी आज पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज नवे सरकार सत्तेवर आले. त्यातच आता राज्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, जागतिक बँकेने महाराष्ट्रासाठी १८८.२८ कोटींचे कर्ज मंजूर केले. जागतिक बँकेने एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली. त्यामुळे नव्या सरकारच्या काळात विकास कामांना गती येणार आहे.
जागतिक बँकेने हे कर्ज कमी विकसित जिल्ह्यांमध्ये आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी दिले आहे. या कर्जामुळे जिल्ह्यांमध्ये विकास कार्यक्षम करण्यासाठी मदत होईल. ज्यात जिल्हा नियोजन आणि विकास धोरणांचा समावेश असेल, असे बँकेने म्हटले आहे. या अंतर्गत गुंतवणुकीमुळे जिल्ह्यांना आवश्यक डेटा, निधी आणि कौशल्ये सुसज्ज होण्यास मदत होईल. जेणेकरून जिल्ह्यांचा विकास आणि रोजगार निर्मिती होईल. ज्याने सार्वजनिक पैशाचे मूल्य जास्तीत जास्त वाढेल. या जिल्ह्यांना आवश्यक निधी प्रदान करणे आणि रोजगार निर्मिती धोरणांसाठी कौशल्य प्रदान करण्यासाठी गुंतवणुकीसाठी या कर्जाचा वापर होईल. तसेच पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून व्यवसायांसाठी ई-सरकारी सेवा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रकल्पाची अंमलबजावणी, अपेक्षित फायदे शक्य होणार
हे कर्ज इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटकडून देण्यात आले. कर्जाचा कालावधी १५ वर्षांचा आहे, ज्यामध्ये ५ वर्षांच्या वाढीव कालावधीचा समावेश आहे. या विस्तारित कालमर्यादेमुळे महाराष्ट्राला प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचे अपेक्षित फायदे मिळण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असे सांगण्यात येत आहे.