18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeशेतकरी आंदोलक दिल्लीच्या वाटेवर!

शेतकरी आंदोलक दिल्लीच्या वाटेवर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंजाब-हरियाणा सीमेवर मागील ९ महिन्यांपासून आंदोलनासाठी बसलेले शेतकरी आता दिल्लीकडे निघाले आहेत. सर्व शेतकरी संघटनांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. शेतकरी पायी चालत अंबालाकडे निघाले. आंदोलक शेतक-यांनी रस्त्यातील बॅरिकेड्स आणि काटेरी तारा उखडून टाकल्या आहेत.

हरियाणा पोलिसांनी आंदोलकांना इशारा दिला, तरीही शेतकरी थांबले नाहीत. दरम्यान शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. शेतक-यांचा विरोध पाहता हरियाणाच्या गृहसचिव सुमिता मिश्रा यांनी पंजाब-हरियाणा सीमेला लागून असलेल्या अंबालामधील ११ गावांमध्ये इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दलानं बॅरिकेड्स लावल्याने शेतक-यांना रोखण्यात यश मिळाले आहे. एमएसपी, कर्जमाफी आणि पेन्शन यासारख्या १३ मागण्यांसाठी फेब्रुवारी २०२४ पासून आंदोलन सुरू आहे. शेतक-यांच्या या मोर्चाला हरियाणा सरकारने परवानगी दिलेली नाही.

शेतक-यांच्या मागण्या…
– शेतक-यांच्या सर्व शेत मालाला हमीभाव देणारा कायदा करावा.
– स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
– शेतकरी आणि शेतमजूरांची कर्जमाफी करावी.
– भूमीअधिग्रहण कायदा २०१३ पुन्हा एकदा लागू करण्यात यावा.
– लखीमपूर खिरी इथे मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटूंबाना मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी.
– मुक्त व्यापार करार रद्द करण्यात यावा.
– वीज विधेयक २००० रद्द करण्यात यावे.
– मसाल्याच्या पदार्थासाठी राष्ट्रीय आयोगाचं गठन केलं जावं.
– संविधानाची पाचवी सूची लागू करून आदिवासींच्या जमीनीची लूट थांबवण्यात यावी.
– खोटे बियाणं, कीटकनाशक, खतं तयार करणा-या कंपन्यांच्या विरोधात कायदा करण्यात यावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR