18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूर‘आरसीसीची’ ११ वी नीट, जेईई प्रवेशासाठी १५ डिसेंबरला स्कॉलरशिप परीक्षा

‘आरसीसीची’ ११ वी नीट, जेईई प्रवेशासाठी १५ डिसेंबरला स्कॉलरशिप परीक्षा

लातूर : प्रतिनिधी
देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या प्रा. मोटेगावकर सरांच्या ‘आरसीसी’ने १० वी तून इयत्ता ११ वीत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी १०० टक्केपर्यंत स्कॉलरशीपची संधी उपलब्ध करून दिली आहे. आरसीसीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठीची आरसीसी-सेट ही स्कॉलरशिप परीक्षा रविवार दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. महाराष्ट्रातील तब्बल ५० पेक्षा जास्त शहरात एकाच वेळेत ही परीक्षा पार पडणार असून यासाठी  विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे .या परीक्षेसाठीची नोंदणी आरसीसी चीवेबसाईट www.rccpattern.com  यावर विनाशुल्क उपलब्ध असल्याची माहिती आरसीसी व्यवस्थापनाने दिली आहे.
या परीक्षेसाठी स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड आणि आयसीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांना मेडिकल -पिसीबी ग्रुपसाठी व इंजिनियरिंग झ्रपिसिएम ग्रुपसाठी  १० वी विज्ञान (सायन्स) व गणित (मॅथस्) हे अभ्यासक्रमाचे विषय आहेत. परीक्षा ४०० गुणाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची तसेच 90 मिनिटांची असेल .या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ठिकाण एसएमएसद्वारे तसेच हॉलतिकीटद्वारे १० तारखेनंतर जाहीर करण्यात येईल.
परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करणा-या ६० टॉपर  विद्यार्थ्यांची प्रत्येक शाखेमध्ये एम्स बॅच असणार आहे. याशिवाय टॉपर विद्यार्थी अर्जुना, सुपर फोटॉन, फोटॉन या कमी विद्यार्थी संख्या असलेल्या स्पेशल बॅचेस मध्ये प्रवेश मिळणार आहे. तसेच आयआयटी-जेईईची तयारी करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र कॅम्पससह, स्पेशल बॅच असणार आहे. तरी लवकरात लवकर आरसीसी -सेट परीक्षेकरिता रजिस्ट्रेशन करून भविष्यात आपले डॉक्टर/ इंजिनिअर होण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाका असे आवाहन ’ आरसीसी ’ व्यवस्थापनाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR