मुंबई : प्रतिनिधी
ऐन थंडीत गेल्या काही दिवसात अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. पण शेवटी नागरिकांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागल्याचे दिसत आहे. मुंबईत गेल्या ९ वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई आणि सांताक्रूझ केंद्रात सोमवारी १३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये किमान तापमान ११.४ अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले होते.
उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी थंड वारे वाहत आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये धुराचे प्रचंड लोट पसरले आहे. तर राजस्थानमधील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात कोरडे व थंड वारे वाहत असून, उत्तरेकडून येणा-या वा-यांमुळे मुंबईत थंडीचा जोर वाढल्याचं सांगण्यात येत असून येत्या २४ तासांत मुंबईकरांना हुडहुडी भरणार आहे.
मुंबई महाबळेश्वरपेक्षा थंड
सर्वात थंड ठिकाण असलेल्या महाबळेश्वरच्या तुलनेत आज मुंबईत किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई गारठली असून गेल्या नऊ वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रूझ केंद्रात १३.७ अंश सेल्सिअस होती. या भागात किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
येत्या २४ तासांत थंडीची तीव्रता वाढणार
सोमवारी मुंबईत गेल्या ९ वर्षांतील नीचांकी तापमान नोंदले गेले असून मुंबईला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. उत्तरेकडून वाहणा-या थंड वा-यांमुळे येत्या २४ तासांत मुंबई, नाशिक आणि पुण्यनगरीत थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
नाशिक, पुण्याताही कडक वधाळा
थंडी आणि अवकाळी पावसामुळे तापमान वाढले असते. नाशिक शहरातील पारा ९.४ अंश सेल्सिअस असताना निफाडमध्ये ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असती. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थंडी गायब झाली होती. आता पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. येत्या १५ दिवसांत पुण्याला मोठा फटका बसणार आहे. सोमवारी पुण्यात १३ ते १४ अंश तापमानाची नोंद केली जाण्याचा अंदाज आहे. तर येत्या काही दिवसात तापमान ११ अंशांवर जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.