अक्कलकोट : अक्कलकोट शहरातून शेकडो श्वानांचा मृत्यू विषबाधेतून झाला आहे, असा संशय व्यक्त करीत शनिवारी सायंकाळी शहरातून शेकडो प्राणिमित्रांनी एकत्र येत ‘कँडल मार्च’ काढण्यात आला. त्याप्रसंगी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
राज्य श्वान संघटना, प्राणिमित्र यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट शहरातून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून ते प्रमुख मार्गावरून निषेध कँडल मोर्चा काढण्यात आला. यावेळी रोशन पाठक, दिव्य वर्मा, अतिश कटारे, महेश धोंगडे, अनु प्रीती, मंजूषा पंचवाडकर, समर्थ हत्ते, प्रणिता जिंदे, प्रशांत केसकर, सिद्धाराम गुब्याड, राकेश मुका, रोहित कुमार, सुचित्रा गडद, राकेश कानडे, श्रीकांत झिपरे, अविरज सिद्धे, राहुल राठोड, समर्थ घाटगे, रोहितमोरे, बबलू जाधव, शिवराज जकापुरे, अनिल पाटील, आकाश जमादार, रवी माशालकर, सागर पेटकर, असे दोनशेहून अधिक प्राणिमित्र सहभागी झाले होते. यावेळी अतिश कटारे, रोशन पाठक, प्रशांत केसकर, श्रीकांत झिपरे, अनु प्रीती, मंजूषा पंचवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले.
याप्रकरणी अनेक वेळा भेट दिली असता, नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यानंतर याबाबत पोलिस अधीक्षकांना भेटून हकिकत सांगितली असता, चांगलं सहकार्य लाभत आहे. अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. लवकरच तपास पूर्ण होईल. दोषींवर कारवाई होईल, अशी आशा आहे असे प्राणिमित्र आतिष कटारे यांनी सांगीतले.