24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकंगाल पाकिस्तानची वाटचाल अराजकतेकडे?

कंगाल पाकिस्तानची वाटचाल अराजकतेकडे?

प्रोफेशनल टॅक्स वाढल्याने व्यापा-यांमध्ये संताप

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारताचा शेजारी देश पाकिस्तान आता जवळपास कंगाल झाल्यात जमा आहे. पाकिस्तानची आर्थिक घडी पूर्णपणे बिघडली असून देश अराजकतेच्या वाटेने जातोय की काय, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानमधील व्यापा-यांवर आता एक कर लावण्यात आला आहे. प्रोफेशनल टॅक्स असे त्याचे नाव असून रावळपिंडीतील व्यापारी आणि दुकानदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

पाकिस्तानध्ये व्यापा-यांवर प्रोफेशनल टॅक्स लावण्यात आला असून त्यामुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या करामुळे दैनंदिन वस्तू महाग होण्याची भीती आहे. पाकिस्तानमधील व्यापा-यांमध्ये दहशत निर्माण होण्याचे कारण म्हणजे दुकानदारांना ५० हजार ते २ लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत व्यावसायिक बिले भरण्याचे आदेश देण्यात आली आहेत. भारतीय चलनात पाहिले तर त्याची रक्कम १५ हजार ते ६१ हजार रुपये इतकी होते.

व्यापा-यांमध्ये संताप
व्यावसायिक कर वाढल्यानंतर रावळपिंडी विभागातील व्यापा-यांमध्ये संताप आहे. व्यापारी संघटनांमध्ये याबाबत दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. रावळपिंडी सेंट्रल ट्रेड युनियनचे प्रमुख मरकाजी अंजुमन ताजरन म्हणतात की, व्यापा-यांनी हा अनावश्यक आणि चुकीचा कर भरू नये. त्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR