20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रबांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात कडकडीत बंद

बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात कडकडीत बंद

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
गेल्या महिन्याभरापासून बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर होणा-या हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. दरम्यान ४ डिसेंबर रोजी जमावाने हिंदूंच्या शंभरहून अधिक घरांची तोडफोड केली. हिंदूंवर होणा-या हल्ल्यांचा आता भारतभर रोष दिसून येत आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणा-या अत्याचाराच्या विरोधात मराठवाड्यात कडकडीत बंद पाळला जात असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, बांगलादेशात हिंदूंवर होणा-या अत्याचाराविरोधात मराठवाड्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असून अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. परभणीत शाळा-महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना सोडण्यात आले तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हिंदू जनजागरण समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन आंदोलने करण्यात येत आहेत. यात रामगिरी महाराजही सहभागी झाले आहेत.

बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात मराठवाड्यात रोष उफाळला आहे. आज सकाळपासून परभणी आणि परळीत बंद पुकारण्यात आला आहे. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत असून शाळा व महाविद्यालयांतूनही विद्यार्थ्यांना सोडण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर परभणीत मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत.

परळीत बांगलादेश अत्याचाराचे पडसाद
बांगलादेशात हिंदूंवर होणा-या अत्याचाराविरोधात बीडच्या परळीत आज ‘परळी बंद’ची हाक दिली आहे. सकाळपासून व्यापा-यांनी आपली आस्थापने बंद ठेवून ‘बंद’ला पाठिंबा दिला. परळी शहर आज कडकडीत बंद पाळत असल्याचे चित्र आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात निषेध नोंदवण्यासाठी परळीकर उपस्थित राहणार आहेत.

रामगिरी महाराजही मोर्चात उतरले
बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू जनजागरण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात वादग्रस्त ठरलेले महंत रामगिरी महाराज उतरले असून रामगिरी महाराज यांनी आजच्या आंदोलनात कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य करू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा ताफा तैनात असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR