सोलापूर : प्रार्थना फाऊंडेशन ही संस्था सोलापूर मधील मोरवंची या गावी शेतकरी आत्महत्या ग्रस्त,वंचित,निराधार मुलांसाठी प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प चालवते तर अनाथ, बेघर,निराश्रित वयोवृद्ध लोकांसाठी मोफत वृद्धाश्रम चालवते.तसेच संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
संस्थेची गरज ओळखून अरविंद किणीकर यांनी प्रार्थना फाऊंडेशनला अंबुलन्स भेट देण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या पत्नी सुजाता किणीकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते त्यांच्या समरणार्थ ही अंबुलन्स प्रार्थना फाऊंडेशन ला देण्यात आली.
या अंबुलन्स चा उपयोग आश्रमातील वृद्ध व मुलांसाठी तर होणारच आहे त्याच बरोबर मोरवंची,शिरापूर,रानमसले,बीबी दारफळ, लांबोटी,भांबेवाडी या पंचक्रोशीतील लोकांना याची मोफत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ज्या भागात आज ही आरोग्यसेवा पोहचू शकत नाही,जिथे लोक स्थलांतर करतात,ऊसतोड कामगार,झोपडपट्टी भागात तसेच रस्त्यावर पडलेल्या बेघर लोकांना ही या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा पुरवली जाणार असल्याचे मत संस्थेच्या सचिव अनु प्रसाद मोहिते यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी आश्लेषा देखणे व सिमी किणीकर यांनी प्रार्थना फाऊंडेशन च्या पुढीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अंबुलन्स ची सेवा जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. या प्रसंगी संस्थेचे संचालक सोमनाथ लामगुंडे यांनी अरविंद किणीकर यांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले कार्यक्रमच्या प्रसंगी अरविंद किणीकर,भालचंद्र किणीकर,सिमी किणीकर,आश्लेषा देखणे,शिरीष देखणे,सोमनाथ लामगुंडे,संतोष क्षिरसागर,प्रसाद मोहिते,अनु मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.