परभणी / प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील कोल्हा येथे दि.१० डिसेंबर रोजी आयोजित ५२व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील पोलास, शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून ४९ तर माध्यमिक गटातून १४ प्रयोगांचे सादरीकरण झाले. वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग गटातून ३ विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे सादरीकरण समाविष्ट होते. शिक्षक गटातून एका शिक्षकाने शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात सहभाग नोंदवला.
विज्ञान प्रदर्शनाचा निकाल खालील प्रमाणे. उच्च प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगावची सदृशी अंबादास पिंपळे प्रथम, श्रुती येडे द्वितीय (जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय मानवत रोड), संध्या सुरेश होंडे तृतीय (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुढी), दिव्यांग विद्यार्थी उच्च प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत स्नेहल अनिल पकवाने प्रथम, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट प्रथम दुर्गा केशव नाईक (जिल्हा परिषद प्रशाला रामपुरी बुद्रुक), द्वितीय ऋतुजा पंडितराव शेळके (राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव), तृतीय निखिल विनोद राऊत (जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा), दिव्यांग विद्यार्थी माध्यमिक गट प्रथम हनुमान तुकाराम घोलप (सरस्वतीबाई भाले पाटील हायस्कूल विद्यालय मानवत), माध्यमिक शिक्षक गटामधून भरतकुमार आत्माराम लाड (जिल्हा परिषद प्रशाला रामपुरी बुद्रुक) यांनी क्रमांक पटकावला.
२० वर्षात प्रथमच मानवत तालुक्यातील विज्ञान प्रदर्शन आयोजनाचा बहुमान जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा यांनी मिळवला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माथूर, शिक्षण अधिकारी यांनी संपूर्ण सहभागी विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहून त्यांचा उत्साह व मनोबल वाढवले. सर्व सहभागी विद्यार्थी आणि शाळा यांच्या अभिनंदनासोबत आयोजक प्रशाला कोल्हा तसेच गट साधन केंद्र मानवत सर्व केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी मानवत यांच्या सामूहिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण होगे, काकडे, कवचट यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जि.प. प्रशाला कोल्हाचे मुख्याध्यापक प्रदीप तांबे, केंद्रप्रमुख प्रकाश मोहकरे, उमाकांत हाडुळे, कान्हु लहीरे, विलास लांडगे, ओम मुळे , यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले आहे. तसेच गट साधन केंद्र मानवत येथील सर्व तज्ञ गण, मानवत तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.