16.9 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेचा दुटप्पीपणा : पाकला दिलासा; भारताला मात्र धक्का

अमेरिकेचा दुटप्पीपणा : पाकला दिलासा; भारताला मात्र धक्का

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या गृह खात्याचा वर्षाला एक रिपोर्ट तयार होतो. यार्षीच्या रिपोर्टमध्ये इराणला दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हटले आहे. मागच्या ३९ वर्षांपासून अमेरिका या रिपोर्टमध्ये इराणचा समावेश करत आहे. इराणवर मध्य पूर्वेत अशांततेसाठी आपल्या प्रॉक्सी ग्रुपचा वापर करण्याचा आरोप आहे. काँग्रेसकडून दरवर्षाला जारी होणा-या कंट्री रिपोर्ट ऑफ टेररिज्ममध्ये १९८४ पासून सतत इराणचे नाव घेतले जात आहे.

अमेरिकेचा हा रिपोर्ट अनेक अर्थांनी धक्कादायक आहे. या रिपोर्टमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देणा-या देशांच्या यादीत पाकिस्तानचे नाव नाही. भारत सरकारने अनेकदा पाकिस्तानवर दहशतवाद्यांना ट्रेनिंग, पैसा आणि मदत केल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर अनेक दहशतवादी हल्ले केले. अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या लिस्टमध्ये असे अनेक पाकिस्तानी दहशतवादी आहेत, ज्यांना अजून अटक झालेली नाही.

या रिपोर्टमध्ये इराणशिवाय सीरिया, उत्तर कोरिया आणि क्यूबा सारख्या अन्य देशांना सुद्धा दहशतवादाला प्रोत्साहन देणारे देश म्हणून घोषित करण्यात आले. या सगळ्यामध्ये इराण सर्वात वर आहे. १९७९ साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर १९८४ पासून सतत या लिस्टमध्ये इराणचे नाव येत आहे. इस्रायलवर ७ ऑक्टोबरला हमासने जो हल्ला केला, त्याची इराणला पूर्वकल्पना होती हे सिद्ध करणारा एकही पुरावा नाही, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR