17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रहवेतच मला मेसेज आला

हवेतच मला मेसेज आला

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज नागपुरात पार पडणार आहे. आज संध्याकाळी ४ वाजता नागपूरच्या राजभवनात मोठ्या दिमाखात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रि­पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरुन वातावरण तापलं आहे. त्यात आता हळूहळू मंत्र्­यांची नावे समोर यायला सुरुवात झाली आहे. नुकतंच भाजप नेते गिरीश महाजन यांना मंत्रि­पदासाठी फोन गेला होता.

महायुती सरकारमधील नवीन मंर्त्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात आज संध्याकाळी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. या शपथविधीदरम्यान भाजप नेते गिरीश महाजन हे देखील मंत्रि­पदाची शपथ घेणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश महाजन यांना फोन करुन याबद्दलची माहिती दिली आहे. तिस-यांदा मंत्रिमंडळाची शपथ घेणार
मी आताच नागपुराला विमानाने लँड झालो आणि हवेत असताना मा फोन आला. मी उतरत होतो, तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. त्यांनी मला चार वाजता शपथ घ्यायची आहे, असे सांगितले. मी तिस-यांदा मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहे. माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे’’, असे गिरीश महाजन म्हणाले.

मंत्रिमंडळात नवीन चेह-यांना संधी मिळाली पाहिजे
मी मंत्रिमंडळाची शपथ घेणार आहे. जे.पी. नड्डा, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी आभार मानतो. नवीन पिढी पुढे आली पाहिजे, असं सर्वांना वाटतं. मंत्रिमंडळात नवीन चेह-यांना संधी मिळाली पाहिजे. अनेक ज्येष्ठ नेतेही आहेत. माझी सातवी टर्म आहे. देवेंद्र फडणवीसांसारखे नेतृत्व लाभलेले आहे. चांगलं बहुमत मिळालेलं आहे. आम्हाला चांगलं काम करायचं आहे. पंकजा ताईंना फोन आला हे तुमच्याच माध्यमातून समोर येत आहे’’, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR