मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संगीतातील आयकॉन्सपैकी एक झाकीर हुसैन यांचे सोमवारी सकाळी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे निधन झाले. गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या झाकीर यांची प्रकृती अलीकडेच खालावली होती. झाकीर यांच्या निधनाच्या बातमीने लोकांना धक्का बसला असून त्यांच्या निधनाच्या वृत्तावर सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. झाकीर यांच्या निधनाबद्दल बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, रणवीर सिंग आणि श्वेता तिवारी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बातमीने खूप दु:ख झाले : अक्षय कुमार
बॉलीवूड स्टार अक्षय कुमारने झाकीरजींना श्रद्धांजली वाहिली. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लिहिले, ‘उस्ताद झाकीर खान साब यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने खूप दु:ख झाले. आपल्या देशाच्या संगीत वारशासाठी ते खरोखरच एक खजिना होते. ओम शांती.’
उस्ताद कायमचे… करिना कपूर
करिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे वडील रणधीर कपूर देखील तिच्यासोबत आहेत. या फोटोमध्ये झाकीर आणि रणधीर हसताना आणि हस्तांदोलन करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना करिनाने लिहिले, उस्ताद कायमचे…
रणवीर सिंहने जोडले हात
बॉलिवूड स्टार रणवीर सिंहने झाकीर यांचा एक जुना ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते तबला वाजवताना दिसत आहेत. रणवीरने हात जोडून इमोजीद्वारे त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची भावना व्यक्त केली.
त्यांची लय नेहमी आमच्या हृदयात : भूमी पेडणेकर
अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही झाकीरजींचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत झाकीर तबला वाजवताना दिसत आहेत. भूमीने फोटोसोबत लिहिले की, ‘त्यांची लय नेहमी आमच्या हृदयात गुंजत राहील.’ प्रसिद्ध ड्रमवादक नेंट स्मिथने हे जग सोडून गेलेल्या झाकीरजींचे आभार मानले आणि लिहिले, ‘तुम्ही आम्हाला दिलेल्या संगीतासाठी.’
गुडबाय माझ्या मित्रा…: अनुपम खेर
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी झाकीरजींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले,ह्यााहित नाही हृदय किती दिवस उदास राहणार आहे! आवाज किती वेळ शांत राहणार आहे कुणास ठाऊक !! गुडबाय माझ्या मित्रा. तू गेलास या जगातून! शतकानुशतके आठवणीत राहशील! तूही… तुझी प्रतिभाही.. आणि हृदयाच्या गाभा-याला भिडणारे तुझे बालसुलभ हास्यही !!!’’
आमचा लिजेंड गमावला : श्वेता तिवारी
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने झाकीरजींचा फोटो शेअर करत लिहिले, आज आम्ही आमचा लिजेंड गमावला. ही अत्यंत दु:खद बातमी आहे.’’ झाकीरजींचे स्मरण करताना दिया मिर्झा म्हणाली, ‘‘ते केवळ संगीतात प्रतिभाशाली नव्हते तर सर्वात नम्र, सर्वात प्रेमळ आणि दयाळू व्यक्तींपैकी एक होते.’’ तिने पुढे लिहिले की झाकीरजींच्या हास्याची छाप हृदयावर कायम राहील.
त्यांच्यासारखे तेच : निम्रत कौर
‘द लंचबॉक्स’ मधील अभिनेत्री निम्रत कौर हिने आठवण सांगितली की झाकीरसोबत तिची शेवटची भेट फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली होती. तिच्या पोस्टमध्ये निम्रतने लिहिले की, ‘त्यांच्यासारखा दुसरा कोणी नसेल.’
जगातील उत्कृष्ट संगीतकारांपैकी एक असलेल्या झाकीर हुसैन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांनी संगीताचा अभूतपूर्व वारसा मागे ठेवला आहे.