सोलापूर-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धरमवीर मीना हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने त्यांचे स्वागत करताना सोलापुरी चादर च भेट म्हणून देण्यात आली. सोलापुरी चादरोची रंगसंगती, डिझाईन पाहून ते जणू ‘सोलापुरी चादरी च्या प्रेमात पडल्याचे दिसून आले. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटपार्म क्रमांक पाचच्या शेजारी तिकीट बुकींग काउंटर सुरु करण्यात यावी, अशी मागणी सोलापूरकरांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून करण्यात येत होती. महाप्रबंधक मीना यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यास यश आले आहे. सोलापूर-सिकंद्राबाद-सोलापूर इंटरसिटी सुरु करण्यात यावी, अशी मागणी लावून धरण्यात आली असता याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
सोलापूर-नागपूर-विलासपूर-रायपूर आणि सोलापूर-हावडा एकसप्रेस सुरु करण्यात यावी. वंदेभारत सेमी सुपरपास्ट एकसप्रेसचे मुंबई ते सोलापूर वेळेत बदल करावी आदी मह्यागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे देण्यात आलेयाप्रसंगी ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चे राजू राठी, धवल शहा, पशुपती माशाळ, सुकुमार चंकेश्वरा, शैलेश बच्चुवार, संजय कंदले, दयासागर सालुटगी, गिरीश बिंगी, ‘डीआरएम’चे नीरज डोलारे, शैलेश परिहार, स्टेशन मास्तर सी.एल. मीना उपस्थित होते.
सोलापूर-पुणे-सोलापूर करिता दररोज सायंकाळी ५ ते ५यावेळेत नवीन इंटरसिटी सुरु करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत पूर्ववत सुरु करावी, अशीही मागणी करण्यात आली. टिकेकरवाडी येथे टर्मिनल मंजूर करण्यात आले. हुतात्मा एकसप्रेसची वेळ बदलण्यात आली आणि वन स्टेशन वन प्रॉडकटचे स्टॉल सुरु करण्यात आले. याबद्दल चेंबर ऑफ कॉमर्सने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.