22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeलातूर१४० ग्रामपंचायतींना ‘ट्रायसायकल’चा पुरवठा

१४० ग्रामपंचायतींना ‘ट्रायसायकल’चा पुरवठा

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील ५६० पैकी १४० ग्रामपंचायतींना कचरा गोळा करण्यासाठी बॅटरी ऑपरेटर ट्रायसायकल व म्यॅनुअल ट्रायसायकलचा पुरवठा करण्यात येत आहे. सदर ट्रायसायकलचा ग्रामपंचायतींना कोणत्याही स्वरूपाची सुचना न देता शासनाच्या स्वच्छता व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली पुरवठा होत आहे. सदर पुरवठादार कंपनीने त्या परत घेवून जाव्यात अशी मागणी लातूर तालुका सरपंच संघटनेने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर जिल्हयातील ज्या ग्रामपंचायतींनी स्वच्छता व घनकचरा, सांडपाणी व्यवस्थानाच्या संदर्भाने आराखडे तयार केले होते. त्यानुसार कचरा गोळा करण्यासाठी ज्या गावात ट्रायसायकल नाही, अशा ५६० गावांची यादी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत गटविकास अधिकारी यांच्याकडून मागवून जि. प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने शासनाला सादर केली होती. शासनाने राज्यस्तरावर ट्रायसायकलचे टेंडर काढून लातूर जिल्हयातील ग्रामपंचायतींना न विचारताच जवळपास १४० गावांना त्या तीन महिण्यापासून वाटपही सुरू केले आहे. यात अहमदपूर तालुक्यातील १८ ग्रामपंचायती, औसा २५, चाकूर ८, देवणी ४, जळकोट ८, लातूर २१, निलंगा ४५, रेणापूर १४, शिरूर अनंतपाळ १ तर उदगीर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जिल्हयातील २९४ ग्रामपंचायतींच्याकडे ट्रायसायकल आहेत. तर ६७ ग्रामपंचायती या गृप ग्रामपंचायती, वाडया, वस्त्या जोडून आहेत. त्यांना वगळता लोकसंख्येनुसार २२१ ग्रामपंचायतींना बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकल व ३३९ ग्रामपंचायतींना म्यॅनुअल ट्रायसायकल देण्यात येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR