नागपूर : राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचा-यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील कर्मचा-यांसाठी फडणवीस सरकारने दोन दिवसांची अतिरिक्त स्थानिक सुटी जाहीर केली आहे.
खरे तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्य कर्मचा-यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात चर्चा आहे. पण, हा निर्णय होण्याआधी राज्यातील काही सरकारी कर्मचा-यांसाठी फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला. याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला असून या शासन निर्णयानुसार या संबंधित राज्य कर्मचा-यांना २०२५ मध्ये गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्थानिक सुटी राहणार आहे. म्हणजेच राज्यातील इतर भागातील कर्मचा-यांना या दिवशी सुटी राहणार नाही मात्र मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांना या दिवशी अतिरिक्त सुटी राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की २०२५ मध्ये १६ ऑगस्टला गोपालकाला आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशीचा सण असून हे दोन दिवस मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचा-यांना स्थानिक सुट्टी राहणार आहे. दरवर्षी या संबंधित कर्मचा-यांना स्थानिक सुट्टी जाहीर केली जाते. यंदाही या संबंधित कर्मचा-यांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून याबाबतचा जीआर अर्थातच शासन निर्णय देखील काल म्हणजेच १८ डिसेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या संबंधित कर्मचा-यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. फडणवीस सरकारने जारी केलेला हा शासन निर्णय फक्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील राज्य सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांना लागु राहणार आहे, याची नोंद घ्यावी.
महागाई भत्ता किती वाढणार
खरे तर सध्या राज्य कर्मचा-यांना ५० टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. पण हा महागाई भत्ता ५३% करण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. केंद्र कर्मचा-यांना ऑक्टोबर महिन्यापासून ५३% दराने महागाई भत्ता मिळत आहे. महत्वाचे म्हणजे केंद्र कर्मचा-यांसाठी लागू करण्यात आलेली ही वाढ जुलै २०२४ पासून लागू आहे. म्हणजे या कर्मचा-यांना महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम मिळालेले आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचा-यांच्या धर्तीवर राज्य कर्मचा-यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. या चालू महिन्यातच याबाबतचा निर्णय होईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. पण ही वाढ जुलै २०२४ पासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचा-यांना महागाई भत्ता फरकही मिळणार आहे.