सोलापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी एकेरी भाषा वापरत अपमान केला. या विरोधात अमित शहा यांनी राजीनामा देऊन माफी मागावी या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदरशनाखाली, शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन जवळ आंदोलन करून तडीपार अमित शहा यांच्या पुतळ्यास जोडे मार करण्यात आले.
यावेळी अमित शहा विरोधात नीम का पत्ता कडवा हैं, अमित शहा भडवा हैं, अमित शहा माफी मांगो, संघ का संविधान नहीं चलेगा, बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, अश्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी कार्यकर्ते अमित शहा यांच्या पुतळ्यास जोडेमार करताना पोलिसांशी झटापट झाली. यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अमित शहा यांचे हे वक्तव्य संविधानिक पदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीच्या नात्याने चुकीचे असून, अमित शाह यांनी याबद्दल माफी मागितलीच पाहिजे. आणि आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली.
या आंदोलनात प्रदेश चिटणीस संजय हेमगड्डी, मा. विनोद भोसले, अनुसूचित जाती विभाग शहर अध्यक्ष उमेश सुरते, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, बाबुराव म्हेत्रे महेश लोंढे बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तिकोंडा, अँड केशव इंगळे, व्हीजेएनटी अध्यक्ष युवराज जाधव, राहुल वर्धा, संजय गायकवाड, लखन गायकवाड, तिरूपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, अनिल मस्के, नागेश म्याकल, परशुराम सतारेवाले, विवेक कन्ना, राजेश झंपले, शिवशंकर अंजनाळकर, संघमित्रा चौधरी, संध्या काळे, शोभा बोबे, सुमन जाधव, सलीमा शेख, मुमताज तांबोळी, किरण सुर्वे, रुपेश गायकवाड, मौलाली शेख इंगळगी, अंकुश बनसोडे, नागनाथ शावणे मुमताज शेख, दत्तात्रय गजभार, सोमनाथ व्हटकर अनिता भालेराव भगवान शिंदे आदी उपस्थित होते.