22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeराष्ट्रीयधनखड यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला

धनखड यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत कॉंग्रेसचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. दरम्यान, उपराष्ट्रपती जगतीप धनखड यांना पदावरून हटविण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी दिलेली नोटीस फेटाळून लावली. राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेल्यास त्यावर सभागृहात चर्चा होते. मात्र, आता नोटीसच फेटाळून लावली. त्यामुळे आता सभागृहात चर्चा होणार नाही.

राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांच्या वतीने सभागृहात सादर करण्यात आलेल्या आपल्या निर्णयात राज्यसभेच्या उपसभापतींनी सांगितले की, महाभियोगाची नोटीस देशाच्या घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचा आणि विद्यमान उपराष्ट्रपतींची बदनामी करण्याच्या कटाचा भाग होती. दरम्यान, १० डिसेंबर रोजी विरोधी पक्षांमधील ६० सदस्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे जगदीप यांना त्यांच्या पदावरून हटविण्यासाठीच्या नोटिसीवर स्वाक्षरी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR