पोलिसांच्या तपासावर समाधानी नाही, संतोष देशमुख यांच्या कन्येचा टाहो
बीड : प्रतिनिधी
पोलिसांच्या तपासावर आम्ही समाधानी नाहीत. एकूण सात आरोपी आहेत असे बोलले जात आहे. मात्र, त्यातील चार जणांनाच अटक झाली आहे. आणखी तीन आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच मुख्य सूत्रधाराला अटक करावी. माझ्या वडिलाला ज्या प्रकारे मारण्यात आले, तसेच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी, अशी प्रतिक्रिया मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवर होणार असून, वरिष्ठ अधिकारी हा तपास करणार आहेत. तसेच न्यायालयीन चौकशी केला जाणार आहे. यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात केल्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
या तपासावर आम्ही समाधानी नाही. एकूण ७ आरोपी आहेत, असे बोलले जात आहे. मात्र, त्यातील चार जणांनाच अटक करण्यात आली आहे. आणखी तीन आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच मुख्य सूत्रधाराला अटक करावी. माझ्या वडिलाला ज्या प्रकारे मारण्यात आले, तसेच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी. बीडच्या एसपींची बदली नाही तर त्यांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे. कारण ते दुसरीकडे गेल्यावर पण असेच होऊ शकते. आम्ही या कारवाईवर समाधानी नाही. कारण आणखी आरोपी फरार आहेत, असेही वैभवी देशमुख म्हणाल्या.