25.4 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रबदल करण्याआधी निदान मला विचारायला हवे; दीपक केसरकर संतापले

बदल करण्याआधी निदान मला विचारायला हवे; दीपक केसरकर संतापले

नागपूर : प्रतिनिधी
दीपक केसरकर यांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ या योजनेत केलेल्या बदलावर टीका केली आहे. मी त्या खात्याचा माजी मंत्री होतो. निदान बदल करण्याच्या आधी मला विचारायला हवे, मी आता मंत्री नसलो म्हणून काय झाले?, असा सवाल दीपक केसरकरांनी उपस्थित केला.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या ‘एक राज्य, एक गणवेश’ या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना फसल्याने या योजनेत बदल केल्याचे म्हटले जात आहे. मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश दिले जातील, असे म्हटले जात आहे. ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेवर माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले, इतक्या मोठ्या प्रमाणात एखादी योजना राबवायची असेल तर त्यासाठी एखादे वर्ष जावे लागते, आता त्या महिलांनी घेतलेल्या मशिनरी आणि केलेल्या इन्व्हेस्टमेंटचे काय होणार?, निदान त्यांचा तरी विचार करायला हवा होता. सध्या या खात्याचे मंत्री नसल्यामुळे कोणाला विचारणार, म्हणूनच मी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आणि हे बदल करू नका असे सांगणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती दीपक केसरकरांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR