25.9 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeसोलापूरपुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात

पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,पुणे आणि संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य, ओतूर यांच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी, व्याख्याते, दंगलकार नितीन चंदशिवे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ठ साहित्यिक प्रा. संजय घरडे व प्रमुख पाहुणे डॉ. प्रिती मोरे, मोहिनी कारंडे आणि प्रमुख उपस्थितीत म्हणून कथाकार हनुमंत क्षीरसागर, बाबासाहेब जाधव, दादासाहेब सोनवणे हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका सुभाताई लोंढे लिखित जिगरबाज व दीपस्तंभ ही दोन पुस्तके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. किशोर इंगोले,प्रा.नागेश हुलवळे,सुजाता गोविंद नाणेकर, उमा लुकड, अक्षय भोईटे, रुपाली राऊत, सविता धामगये, प्रियंका बेंद्रे, रामचंद्र गायकवाड कविता बाविस्कर,श्रुती दळवी, साधनाताई शेळके, वत्सलाबाई पवार पाटील, आदी. मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, पाच पुस्तके , सन्मानपत्र,रोख रक्कम असे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ठ साहित्यिक संजय घरडे यांनी मनोगत मांडताना आंबेडकरी चळवळीतील इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, दंगलकार नितिन चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करताना, ऐतिहासिक घटनांचा दाखला देत उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजे असे सांगितले.

पुढे ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या संस्थापक अध्यक्षा कविता काळे मॅडम यांनी पुरस्काराच्या बाजारीकरणावर प्रखर भाष्य केले. तसेच डॉ. प्रिती मोरे,मोहिनी कारंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ज्ञानज्योत फाउंडेशन च्या अध्यक्षा कविता काळे मॅडम, संत गाडगे महाराज विचारमंच चे अध्यक्ष रणजित पवार, ज्ञानज्योत च्या कार्याध्यक्ष कांचनताई मून ,कवयित्री रेखा फाले, रघुनाथ दादा कांबळे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन ताई मून तर सूत्रसंचालन संजय गवांदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रणजित पवार यांनी मानले. व कार्यक्रमाची सांगता संत गाडगे महाराजांच्या पसायदानाने करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR