21.6 C
Latur
Monday, December 30, 2024
Homeराष्ट्रीयतरुणांमध्ये लोकप्रिय होतोय ‘सिमर डेटिंग’चा ट्रेंड

तरुणांमध्ये लोकप्रिय होतोय ‘सिमर डेटिंग’चा ट्रेंड

रिलेशनशिपमध्ये एक सुरक्षित मार्ग? तरुणांना लागलीय नात्यांची काळजी

नवी दिल्ली/मुंबई : आजच्या आधुनिक युगात, एका मिनिटात प्रेम आणि दुस-या मिनिटात ब्रेकअप हे पाहता आजची तरूणाई अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे. यातच आता रिलेशनशिपमध्ये नवा ट्रेंड समोर आला आहे तो आहे ‘सिमर डेटिंग’! तरुणांमध्ये होतोय लोकप्रिय, नात्यासाठी एक सुरक्षित मार्ग काय आहे हे ठरविण्यासाठी या डेटिंगचा उपयोग होतो असे म्हटले जात आहे.

ते म्हणतात ना, नाते हे एखाद्या धाग्याप्रमाणे असते, दोन्ही कडून ओढले गेले तर ते तुटणारच, मात्र दोघांपैकी एकाने जरी यात समतोल राखण्याचा प्रयत्न केला तर ते दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असते. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीनुसार नात्यातही बरेच बदल झालेले पाहायला मिळतात. आपण पाहतो, या आधुनिक युगात, एका मिनिटात प्रेम, तर दुस-या मिनिटात ब्रेकअप, यामुळे अनेकजण नैराश्याकडे ढकलले जातात. हे पाहता आजची तरुणाई रिलेशनशिपमध्ये पडताना अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे. नात्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून लोक नवीन ट्रेंडचा अवलंब करत आहेत, ज्याला सिमर डेट म्हणतात. असे म्हणतात की, हा नात्यासाठी एक सुरक्षित मार्ग मानला जात आहे.

सिमर डेटिंग ट्रेंडमध्ये का?
सिमर डेटिंगचा ट्रेंड होत आहे, कारण लोकांसाठी एकमेकांना ओळखण्याचा हा एक सुरक्षित मार्ग आहे. या डेटिंगमध्ये, लोक हळूहळू एकमेकांशी जोडले जातात, ज्यामुळे ते एकमेकांबद्दल अधिक बोलू शकतात आणि चांगले संबंध विकसित करतात. यामध्ये एकमेकांशी नातेसंबंध निर्माण करणे, त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेणे आणि आपले नाते मजबूत करणे, हे भावनिक बंध मजबूत करते. यात तरुणाई जपून पाऊल पुढे टाकते.

हे आहेत सिमर डेटिंगचे फायदे
– सिमर डेटिंगमध्ये दोघांना एकमेकांना जाणून घेण्याची सुरक्षित संधी मिळते.
– या डेटिंगमध्ये, हळूहळू नातेसंबंधात पुढे जाण्याने, आम्ही एकमेकांना अधिक चांगले आणि अधिक समजून घेण्यास सक्षम ठरते.
– सिमर डेटिंग दोन लोकांमध्ये दर्जेदार वेळ घालवण्याची चांगली संधी देते.
– या डेटिंगमध्ये, एक भावनिक बंध तयार होतो आणि मजबूत होतो.

हे आहेत सिमर डेटिंगचे तोटे
– सिमर डेटिंगमध्ये कधी-कधी हळू हळू एकमेकांच्या जवळ येत असल्यामुळे मध्येच नातं तुटते.
– या डेटिंगमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी जास्त वेळ आणि प्रयत्न करावे लागतात.
– सिमर डेटिंगमध्ये कधी-कधी एकमेकांसोबत दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांच्या काही उणिवा या नात्याला पुढे जाण्यापासून रोखू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR