15.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रभंडारा रुग्णालयात उंदरांचा उच्छाद

भंडारा रुग्णालयात उंदरांचा उच्छाद

भंडारा : प्रतिनिधी
सर्वसामान्य जनतेला उपचार आणि आरोग्यविषयक सेवा देणारे मुख्य केंद्र असलेल्या मुख्यालयातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या उंदरांनी उच्छाद घातला आहे. हे सर्वसामान्य रुग्णालय गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे.

दरम्यान राज्यातील आरोग्य यंत्रणेची अनास्था आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. येथे उंदरांनी उच्छाद मांडला आहे. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभागाकडून सुरू असल्याची ओरड होत आहे. यामुळे इतर आजार वाढीस लागण्याची भीती नातेवाईक व्यक्त करत आहे. याविरोधात रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उंदरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.

जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात उंदरांचा कहर सुरू आहे. जिल्हा रूग्णालयातील रूग्ण कक्षात त्यांनी उच्छाद मांडला. उपचारासाठी भरती असलेल्या रूग्णांच्या अंगावरून अक्षरश: आठ ते दहाच्या संख्येत असलेल्या उंदराची टोळी धुमाकूळ घालत असल्याचे दृश्य समोर आल्याने नातेवाईकांच्या अंगावर काटा आला आहे. आरोग्य यंत्रणा मात्र अद्यापही साखर झोपेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

रुग्णांच्या डब्यातील आणि पिशव्यातील खाद्यपदार्थांचा फडसा पाडतानांचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून एक प्रकारे अप्रत्यक्षपणे रूग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभागाकडून सुरू असल्याची ओरड होत आहे. यामुळे इतर आजार वाढीस लागण्याची भीती नातेवाईक व्यक्त करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR