18.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeअंतरराष्ट्रीयलँडिंगवेळी विमानाला पक्षांच्या थव्याची धडक

लँडिंगवेळी विमानाला पक्षांच्या थव्याची धडक

दक्षिण कोरियातील अपघाताचे कारण आले समोर

सेऊल : दक्षिण कोरियात रविवार दि. २९ डिसेंबर रोजी एक मोठा विमान अपघात झाला असून स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:०७ वाजता बँकॉकवरुन दक्षिण कोरियात १८१ प्रवाशांना घेऊन येणारे बोइंग ७३७ विमान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान कोसळले. या अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये सहा क्रु मेंबर्सचाही समावेश आहे.

सोशल मीडियावर या अपघाताचे काही व्हीडीओ व्हायरल होत आहेत. या व्हीडीओमध्ये विमान धावपट्टीवरुन घसरताना, त्यात भीषण आग लागल्याचे दिस आहेत. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, विमानाने पक्ष्यांच्या थव्याने धडक दिल्यामुळे त्याचे लँडिंग गियर खराब झाले. लँडिंग गिअर निकामी झाल्यानंतर पायलटने थेट विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचा वेग कमी करता आला नाही आणि विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाउंड्री वॉलले धडकले.

सर्वत्र आगच आग
विमान धडकताच त्याचा मोठा स्फोट झाला आणि सर्वत्र आग पसरली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांना जीव वाचवण्यासाठीच काहीच करता आले नाही. अपघातावेळी विमानात १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. प्रवाशांपैकी १७३ दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत, तर इतर २ थायलंडचे होते. सुदैवाने यातील दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR