16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रसुरेश धसांना ‘परळी पॅटर्न’ भोवणार?

सुरेश धसांना ‘परळी पॅटर्न’ भोवणार?

बीड : प्रतिनिधी
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना ‘परळी पॅटर्न’ शब्द वापरून काही अभिनेत्रीची नावे घेतली होती. त्यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे देखील नाव घेतले होते. त्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरून दिले होते. त्यानंतर प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्या व्यक्तव्याविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. हा अर्ज राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला असून, महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांना काही निर्देश दिले आहेत.

बीडमधील देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याविरुद्ध प्राजक्ता माळीने राज्य महिला योगाकडे तक्रार दाखल केली. तसे तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने एक्सवर माहिती दिली आहे. त्यामुळे आता आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समोरे जायला तयार : सुरेश धस
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांनी ‘परळी पॅटर्न’ शब्द वापरून केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. तसेच धस यांची महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या बाबत भाजप आमदार सुरेश धस म्हणाले, माझ्यासाठी तो विषय संपला आहे. त्यावर जर प्रश्न विचारणार असाल तर मी बोलणार नाही. जे काही झाले त्याला मी समोरे जायला तयार आहे. माझी बाजू अनेकांनी मंडली आहे. संतोष देशमुख यांची हत्या आणि बीड जिल्ह्याचे झालेले जंगल राज याचा फोकस डिव्हर्ट करू नका असे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR