16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रनव्या वर्षाच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज!

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज!

दारूड्यांवर असणार सीसीटीव्हीची नजर राज्याभरात लाखोे पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई/पुणे
अवघ्या काही तासांत जुने वर्ष सरणार आणि नव्या वर्षाचं स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरातील लोक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्ताने पर्यटनस्थळी अलोट गर्दी झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बूक झाले आहेत. एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये राहण्यासाठी पर्यटक पाहिजे ती रक्कम मोजायला तयार आहे. तर हॉटेल मालकही अव्वाच्या सव्वा रक्कम आकारत आहे. रात्र धुंदीत जागवण्यासाठी तर तळीरामांचीही वेगळीच लगबग सुरू झाली आहे. मात्र, या सर्वांना चाप लावण्यासाठी राज्यातील पोलिस आणि वाहतूक पोलिसही सज्ज झाले आहेत. दारूड्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात विदेशी पर्यटकांची प्रचंड रेलचेल झाली आहे. सकाळपासूनच देश-विदेशातील पर्यटकांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरात हजेरी लावली आहे. तर, अलिबागला जाण्यासाठी मुंबईकरांची पहिली पसंती दिली आहे. गेटवेवर पर्यटकांनी बोट पकडण्यासाठी रंगा लावल्या आहेत. दरवर्षी ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी लोणावळ्यात हजारो लोक येत असतात. लोणावळ्यात लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२५ दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिका-यांनी दिले आहेत.

पब, हॉटेल चालकांची खैर नाही
हॉटेल आणि पबमधून ड्रग्स दिले जाऊ नये, त्याशिवाय अल्पवयीन मुलामुलींना दारू देऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच थर्टीफर्स्टच्या दिवशी नियमांचे पालन न करणा-या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.

गड आणि अभायरण्यात गस्त
३१ डिसेंबरला गडकिल्ले, अभयारण्ये, आणि शहरातील टेकड्यांवर ‘सेलिब्रेशन’ करणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला असून निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पर्यटकांची पार्ट्यां करण्याची मानसिकता लक्षात घेऊन विभागातर्फे संरक्षित गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी, राखीव वन क्षेत्रात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वन कर्मचारी रात्रभर गस्त घालणार आहेत.

कुठे असणार पोलिसांची नजर?
राज्यातील पोलिस विभाग अलर्ट मोडवर असून हजारो पोलिस अधिकारी-कर्मचारी, विशेष पथक तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील प्रमुख शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवले जाणार आहे. रेस्टॉरंट, पब आणि फार्महाऊसवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. त्या ठिकाणी चुकीचे काही आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. पानटप-या, गोडाऊन्सही चेक केली जाणार आहेत. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करा. कुणालाही आपल्यामुळे धोका होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR