25.7 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीयचिनी हॅकर्सनी भेदली अमेरिकी सायबर सुरक्षा

चिनी हॅकर्सनी भेदली अमेरिकी सायबर सुरक्षा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
चीनच्या हॅकर्सनी अमेरिकेची सायबर सुरक्षा भेदली आहे. ट्रेझरी विभागाच्या संगणक सुरक्षेचा या महिन्यात भंग झाला. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ही मोठी घटना असल्याचे सांगत चिनी हॅकर्सनी डॉक्युमेंट्सची चोरी केली असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेतील खासदारांना पाठविलेल्या एका पत्रानुसार, हा सुरक्षेचा भंग एका थर्ड पार्टी सायबर सुरक्षा सेवा देणारी कंपनी ‘बियॉन्ड ट्रस्ट’च्या माध्यमातून झाला आहे. हॅकर्स ‘बियॉन्ड ट्रस्ट’द्वारे वापरण्यात येत असलेल्या एक महत्वपूर्ण सुरक्षेपर्यंत पोहोचले. जिथे त्यांना अवर्गीकृत दस्तऐवजांचा अ‍ॅक्सेस मिळाला.

या पत्रानुसार, हॅकर्सने ट्रेझरी डिपार्टमेंटल ऑफिसेस यूजर्संच्या रिमोट तांत्रिक साहाय्य प्रदान करण्यासाठी वापरल्या जाणा-या क्लाउड आधारित सेवेमध्ये प्रवेश करण्यासाठी वेंडरद्वारे वापरल्या जाणा-या कीमध्ये प्रवेश मिळवला. या कीमध्ये प्रवेश केल्याने हॅकर्सला सेवेची सुरक्षा ओव्हरराइड करता आली. त्यांनी काही ट्रेझरी डिओ यूजर्सच्या वर्कस्टेशन्समध्ये दूरस्थपणे प्रवेश केला आणि काही अवर्गीकृत दस्तऐवजांचा अ‍ॅक्सेस मिळवला.

ट्रेझरी डिपार्टमेंटकडून याबाबत सांगण्यात आले आहे की ८ डिसेंबर रोजी ‘बियॉन्ड ट्रस्ट’ द्वारे झालेल्या सुरक्षा भंग प्रकरणी सतर्क करण्यात आले होते. ते यूएस सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्टर सिक्युरिटी एजन्सी आणि एफबीआयच्या सहकार्याने हॅकच्या परिणामाचे मूल्यांकन करत आहेत.

चीनने हॅकिंगचा दावा फेटाळला
ट्रेझरी अधिका-यांनी हॅकिंगच्या घटनेबाबत अधिक तपशील दिलेला नाही. वॉशिंग्टनमधील चीन दूतावासाच्या प्रवक्त्याने हॅकिंगचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, चीनचा कोणत्याही तथ्यात्मक आधाराशिवाय अमेरिकेच्या चीनविरूद्धच्या बदनामीकारक आरोपांना विरोध राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR