28.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeलातूरदेशमुख कुटूंबियांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन 

देशमुख कुटूंबियांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन 

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख, अवीर अमित देशमुख, अवान अमित देशमुख यांनी दि. १ जानेवारी रोजी दुपारी महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
नूतन वर्षानिमित्त देशमुख कुटुंबियांनी तुळजापूरला जाऊन श्री तुळजाभवानी मातेने दर्शन घेऊन आरती केली. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, सयाजीराव देशमुख, अमर खानापुरे, सचिन पाटील, विनोद वीर, अ‍ॅड. दीपक राठोड, बुबासाहेब पाटील, रणजीत इंगळे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR