19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्र... तर तुझा दुसरा संतोष देशमुख करू

… तर तुझा दुसरा संतोष देशमुख करू

अवैध धंदेवाल्यांची सरपंच पतीला धमकी

कळंबेश्वर : मस्साजोगच्या सरपंचांच्या निर्घृण हत्येला आता महिना होत आला आहे. दोन दिवसांपूर्वी ज्याच्यावर या हत्ये प्रकरणाचे आरोप होत आहेत त्या वाल्मीक कराडला अटक झाली आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच निर्ढावलेले अवैध धंदेवाल्यांनी कळंबेश्वर गावाच्या सरपंच पतीला त्याचाही संतोष देशमुख करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अवैध धंदे चालू दिले नाहीत तर तुझा संतोष देशमुख करेन अशी धमकी देत १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. कळंबेश्वर येथील सरपंच पतीचा गळा आवळून तिघांनी मारहाण करत खिशातील नगदी पैसे आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सरपंच पती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेफळ पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार केली आहे.

खुरद यांनी गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गावातीलच चिडलेल्या अवैध धंदे वाल्यांनी रस्त्यात अडवून सुभाष खुरद यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. याप्रकरणी अवैध व्यवसाय करणारे आरोपी गणेश भराड, आकाश सपकाळ सह इतर तीन आरोपी, अशा पाच आरोपींवर कलम ३०९ (२), ११५(२) ३५२, ३५१(२), ३५१ (३) ३(५) बीएनएस-२०२३ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे असे पोलिस उपनिरीक्षक आजिनाथ मोरे यांनी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR