19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर

जितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर

घरात घुसून शूटिंग

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलिस (गोपनीय विभागची) नजर असल्याचे समोर आले आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलिस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले. ही पत्रकार परिषद आव्हाडांच्या घरात सुरू होती. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पत्रकार परिषदेचे चित्रिकरण देखील करण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय पोलिस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत घुसले, त्यांच्याकडून चित्रिकरण देखील करण्यात आले. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलिस का वॉच ठेवत आहेत? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच आव्हाड भडकले. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले? आसा सवाल आव्हाडांकडून पोलिसांना करण्यात आला आहे. सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान यावेळी आव्हाड यांनी वरिष्ठ अधिका-यांना देखील फोन केला. जोपर्यंत वरिष्ठ पोलीस इथे येत नाही तोपर्यंत यांना सोडणार नाही, असं आव्हाड यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत दिली दखल
जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय विभागाचे पोलिस तिथे पोहोचले, ही पत्रकार परिषद आव्हाड यांच्या घरात सुरू होती. पोलिसांकडून पत्रकार परिषदेचे चित्रिकरण देखील करण्यात आले आहे. यावरून आता आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलिस घरात का घुसले? सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR