19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeसोलापूरविद्यापीठाशी संलग्नित अवघ्या ४६ महाविद्यालयांमध्येच पूर्णवेळ प्राचार्य

विद्यापीठाशी संलग्नित अवघ्या ४६ महाविद्यालयांमध्येच पूर्णवेळ प्राचार्य

सोलापूर : मुख्याध्यापक, प्राचार्य हा त्या शैक्षणिक संस्थेचा आरसा मानला जातो. विद्यार्थीहिताचे निर्णय त्यांच्याच माध्यमातून होतात. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे तास वेळेवर होतात का, अभ्यासक्रम किंवा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या अडचणी देखील त्यांच्याच माध्यमातून सोडविल्या जातात. मात्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित ११४ उच्च महाविद्यालयांपैकी अवघ्या ४६ महाविद्यालयांनाच पूर्णवेळ प्राचार्य नाहीत. भरती सुरू नसल्याने अशी अवस्था झाल्याचे विद्यापीठ व महाविद्यालयांकडून सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील भाई छन्नुसिंग चंदेले कॉलेज ऑफ सोशल वर्क, सुशीलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्स, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲन्ड सायन्स, डी.ए.व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, डी.जी.बी. दयानंद लॉ कॉलेज, प्रिं.के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर सोशल असोसिएशनचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, युनियन एज्युकेशन सोसायटीचे महिला महाविद्यालय, वसुंधरा कला महाविद्यालय या सोलापूर शहरातील आणि संतोष भीमराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (मंद्रुप), बार्शीतील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज व राजर्षी शाहु लॉ कॉलेज,

वैरागमधील जय जगदंबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय व सौ. सुवर्णलता गांधी महाविद्यालय, जय जगदंबा एम.एड. महाविद्यालय, करमाळ्यातील प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, वेळापूरमधील अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, अकलूजमधील शंकरराव मोहिते महाविद्यालय, माळशिरसमधील समीर गांधी कला महाविद्यालय, मंगळवेढ्यातील श्री. संत दामाजी महाविद्यालय, कुर्डुवाडीतील के.एन. भिसे आर्टस्‌, कॉमर्स ॲन्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, पंढरपुरातील कॉलेज ऑफ फार्मसी व यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय भोसे (क.), सांगोला महाविद्यालय या उच्च महाविद्यालयांचा कारभार प्रभारी प्राचार्यांवर सुरु आहे.

रोस्टर तपासणी न झाल्याने किंवा शासनाची भरती नसल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नाहीत. एका प्राचार्याला चारवेळा (सहा-सहा महिने मान्यता) संधी दिली जाते. तत्पूर्वी, त्यांनी ते पद भरणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांची संलग्नता तीन वर्षांऐवजी एक वर्षासाठी दिले जाते. रोस्टर तपासून त्या पदासाठी मान्यता घेऊन ते पद भरणे आवश्यक आहे. परमनंन्ट प्राचार्य भरावा असे विद्यापीठाकडून वारंवार निर्देश देण्यात आले आहेत.असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु
डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी सांगीतले.

श्री. विठ्ठल एम.एड. महाविद्यालय आणि श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर (पंढरपूर), बार्शीतील श्री. स्वामी समर्थ एम.एड. महाविद्यालय (गाडेगाव रोड), सोजर टिचर ट्रेनिंग सेंटर (बार्शी), स्वामी समर्थ शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बार्शी), सचिन टी. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय (रुई, बार्शी), श्रीमान योगेश सोपल कॉलेज (पांगरी), सिंहगड स्कूल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज (केगाव) या महाविद्यालयांनी बंदचा प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविल्याचेही त्यांच्याकडील माहितीवरून समोर आले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR