18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरघरफोडीच्या गुन्ह्यातील  गुन्हेगाराला मुद्देमालासह अटक

घरफोडीच्या गुन्ह्यातील  गुन्हेगाराला मुद्देमालासह अटक

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील औसा पोलीस ठाणे हद्दी मध्ये अज्ञात आरोपींनी रात्रीच्यावेळी काही घराचा कडी कोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिन्याची चोरी केल्याची घटना घडल्या होत्या. या घटनेतील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ लाख ८२ हजाराच्या मुद्येमसलासह अटक केली असून घरफोडीची तीन गुन्हे ही उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे.  पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून औसा येथील बंद घराचे कडे कोंडा तोडून चोरी करणा-या आरोपीची माहिती मिळाली. त्यावरून माहितीची खातरजमा करून पथकाने लातूर ते नांदेड जाणारे रोडवरील कृषी महाविद्यालय परिसरा मधून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दि. २ जानेवारी रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव शक्तिमान राजू काळे वय २० वर्ष राहणार देवगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ त्याने व त्याच्या आणखीन एक साथीदार नामे निलेश कृष्णा शिंदे, वय अंदाजे २५ वर्ष, राहणार झाडे बोरगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर (फरार) अशांनी मिळून चोरी केलेले दागिन्यापैकी वाट्याला आलेले ३६ ग्राम वजनाचे दागिने किंमत आणि २ लाख ८२ हजार रुपयेचा सोन्याच्या दागिन्याचा  मुद्देमाल असल्याचे कबूल केले.
त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे औसा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या चार गुन्ह्यात पाहिजे असलेला व औसा पोलीस ठाणे हद्दीतील तीन घरफोडी करून सोन्या-चांदीचे मुद्देमाल चोरणा-या आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे मोहन सुरवसे, तुराब पठाण सूर्यकांत कलमे चालक पोलीस अमलदार नकुल पाटील यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR