मोहोळ : खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी गावभेट दौ-यात गावक-यांचे निवेदने स्वीकारून समस्या जाणून घेऊन संवाद साधला.
शासकीय अधिकारी सोबत असल्यामुळे काही समस्या जागेवरच सोडविल्या. आणि इतर समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने गावाचा विकास साध्य करणार आहोत असे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, संभाजी लेंगरे, बाळासाहेब वाघमोडे, बापु वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थ व विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.